Home अकोले अकोले घटना: आईवरून शिवीगाळ केल्याने चुलत भावाचा खून- Murder

अकोले घटना: आईवरून शिवीगाळ केल्याने चुलत भावाचा खून- Murder

Akole Murder Case:  चुलत भावास खाली पाडून त्याचा दगडाच्या गोट्याने मारून खून.

Cousin murder due to obsence word from mother

अकोले: अकोले तालुक्यातील देवठाण येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलत भावाने आईवरुन शिवीगाळ केल्याने राग अनावर झाल्याने भावानेच चुलत भावाचा दगडाने मारून खून केल्याची घटना विजयादशमीच्या दिवशी अकोले तालुक्यातील खडकेवाडी येथे घडली आहे.

बारकू दामू गिरे असे मयताचे नाव आहे. काशिनाथ सोमनाथ गिरे असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

याबाबत अकोले पोलिस स्टेशनला मयताची पत्नी इंदुबाई बारकू धीरे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे कि,  दसऱ्याच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास फिर्यादीच्या घराच्या ओटयाचे जवळ काशिनाथ सोमनाथ गिर्हे (खडकेवाडी, देवठाण तालुका अकोले) त्याचा चुलत भाऊ फिर्यादीचे पती बारकू दामु गिर्हे यांनी आई वरून शिवीगाळ केली याचा राग आल्याने काशिनाथ सोमनाथ गिर्हे याने चुलत भाऊ असलेल्या बारकू दामु गिर्हे यांना खाली पाडून त्याचा दगडाच्या गोट्याने मारून खून केला. फिर्यादीवरुन अकोले पोलिसांत गु.र.न. 456/2022 भा.द.वि. कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक मिथुन घुगे करत आहेत.

Web Title: Cousin murder due to obsence word from mother

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here