Home अहमदनगर अहमदनगर: सावत्र वडिलांचे अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य

अहमदनगर: सावत्र वडिलांचे अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य

Ahmednagar Crime: अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल हावभाव करत लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याची घटना.

Ahmednagar Crime Misbehavior of step father with minor girl

अहमदनगर: नगर येथून एक धक्कादायक कृत्य उघडकीस आले आहे.  सावत्र वडिलाने अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल हावभाव करत लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याची घटना 29 सप्टेंबर रोजी उपनगरात घडली. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

यावरून पीडित मुलीच्या वडिलाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाला आहे. त्यांना एक मुलगी आहे. ती नगर शहरातील विद्यालयात शिक्षण घेते. फिर्यादी मुलीसह दुसर्‍या पतीसोबत उपनगरात राहता. 29 सप्टेंबर रोजी अल्पवयीन मुलीसोबत तिच्या सावत्र वडिलाने अश्लिल हावभाव करून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.

फिर्यादी यांनी त्याला समजवून सांगितले असता त्याने त्यांना शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. सावत्र वडिल त्याच्या मुलीसोबत वारंवार असे कृत्य करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: Ahmednagar Crime Misbehavior of step father with minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here