Home अहिल्यानगर अहमदनगर: महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

अहमदनगर: महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

Ahmednagar Found of the woman's Dead body

Ahmednagar | अहमदनगर: नालेगाव परिसरातील सीना नदीच्या नाल्यामध्ये एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह (Dead body) 25 फेब्रवारी 2022 रोजी आढळून आला होता. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून आणखी एक महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

आज १० ते १२ दिवसांपूर्वी मयत असलेला कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह (Dead body)गायके मळा परिसरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अंदाजे 55 वर्षे वय असलेल्या महिलेचा मृतदेह अहमदनगर शहरातील गायके मळा परिसरात आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने अद्याप ओळख पटलेली नाही.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गायके मळा परिसरातील एका शेतामध्ये महिलेचा मृतदेह असल्याची माहिती गुरूवारी दुपारी एक वाजता कोतवाली पोलिसांना स्थानिक नागरिकांनी दिली.माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. सुमारे 10 ते 12 दिवसांपासून हा मृतदेह तेथे पडून असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ओळख पटविण्याचे काम कोतवाली पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने शवविच्छेदन करण्यास अडचणी निर्माण झाली आहे. जागेवरच शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया कोतवाली पोलिसांकडून सुरू होती.

Web Title: Ahmednagar Found of the woman’s Dead body

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here