Home अहमदनगर नगर जिल्हा हादरला: पती पत्नीचा निर्घुण खून, रक्तबंबाळ

नगर जिल्हा हादरला: पती पत्नीचा निर्घुण खून, रक्तबंबाळ

Ahmednagar Husband and wife brutally murder

राहता | Murder: राहता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील चांगले वस्तीवर पती पत्नीचा निर्घुण खून झाल्याची घटना घडाली आहे. या धक्कादायक घटनेने जिल्हा हादरला आहे.

शशीकांत श्रीधर चांगले वय ६० व सिंधुबाई शशिकांत चांगले वय ५५ असे या खून झालेल्या पती पत्नीचे नाव आहे.

शशिकांत व सिंधुबाई हे दोघेही पती पत्नी शेती व्यवसाय करत आहेत. दारारीज सकाळी लवकर उठून शेतात काम करण्यसाठी जाणारे पती पत्नी अचानक आज लवकर उठले नाही. त्यामुळे शेजारच्यांनी घरी जाऊन पहिले असता हा प्रकार उघडकीस आला.

दोघेही रक्तबंबाळ भरलेले, त्यांच्या डोक्याजवळ फावडे रक्ताने माखलेले पहिल्याने स्थानिक नागरिकांनी राहता पोलिसांना याबाबत माहिती दिली.

राहता पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु केला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे व उप विभागीय अधिकारी संजय सातव व मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.

या दोघांवर फावड्याने वार करून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हत्येमागचे कारण अजून समजू शकले नाही. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Ahmednagar Husband and wife brutally murder

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here