त्यांना बायकोनं मारलं तर ते मोदींनाच जबाबदार धरतील
महाविकास आघाडी सरकारच असं झालंय एकमेकांशी पटत नाही आणि एकच सूर लावला आहे. एकमेकांचे लचके तोडत आहे पण लचके तोडत असताना तिघंही एकत्र आहेत.
एकाचा सुरात बोलतात हे मोदिजीनी केलं. मोदिजीनी केलं पाहिजे. मला तर असं वाटत की एखाद्या दिवशी बायकोनं मारलं तर त्यासाठीही मोदींनाच जबाबदार ठरवतील अशी परिस्थिती झाली आहे अशी कोपरखळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी लगावली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपाने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारवर आरक्षणाच्या मुद्यावर नागपुरात देवेंद्र फडवणीस यांनी टीकास्त्र सोडल आहे.
यावेळी फडवणीस म्हणाले, भाजपचे हजारो कार्यकर्ते ओबीसी हक्काकरिता रस्त्यावर उतरले आहे. एक तर सरकारला ओबीसीचे आरक्षण पुन्हा द्यावं लागेल नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल.
स्वतः काही करायचे नाही मराठा आरक्षण घालवलं, ओबीसी आरक्षण घालवलं, सर्व घटकांना जमीनदोस्त करायचे आणि मोदिजीनी केलं. मोदीमुळेच झालं. म्हणूनच म्हणालो यांच्या बायकोनं मारलं तर म्हणतील मोदिजीच जबाबदार आहेत.
Web Title: If his wife kills him he will hold Modi responsible