Home अहमदनगर ब्रेकिंग: आमदार मोनिका राजळे यांना अटक

ब्रेकिंग: आमदार मोनिका राजळे यांना अटक

Ahmednagar MLA Monica Rajale arrested

शेवगाव | Ahmednagar: कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या आ. मोनिकाताई राजळे व भाजपा कार्यकर्त्यांना शेवगाव पोलिसांनी अटक केली आहे.

कृषी पंपाच्या थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेती पंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. महावितरणच्या या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्यावतीने शेवगाव शहरातील गाडगेबाबा चौकात सोमवारी सकाळी 10.30 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान महावितरणच्या अधिकार्‍यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र चर्चा मान्य न झाल्याने सकाळी 10.30 वाजता सुरू झालेले आंदोलन दुपारी 2.10 वाजेपर्यंत सुरूच होते.

प्रशासनानेही आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र मागणी मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने पोलिसांनी आंदोलकांना अटक केली.

अटक केलेल्यामध्ये आमदार मोनिकाताई राजळे यांच्यासह भाजपाचे तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बापुसाहेब पाटेकर, शहराध्यक्ष रवी सुरोसे, गंगा खेडकर, नितीन दहिवाळकर, नगरसेवक महेश फलके, वाय. डी. कोल्हे, कचरू चोथे आदींचा समावेश आहे.

Web Title: Ahmednagar MLA Monica Rajale arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here