Home Suicide News Suicide: पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची गळफास घेऊन आत्महत्या

Suicide: पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची गळफास घेऊन आत्महत्या

Ahmednagar Husband commits suicide by strangling his wife

अहमदनगर |Suicide| Ahmednagar: पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30 रा. पिंपळगाव कौडा ता. नगर) आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.  पिंपळगाव कौडा येथील गोपीचंद याच्या राहत्या घरात शनिवारी रात्री सात ते रविवारी सकाळी सात वाजेच्यादरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात मयत गोपीचंद याची पत्नी श्रुती कैलास चव्हाण (रा. वडारवाडी, भिंगार) हिच्याविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत गोपीचंद याची आई कमल रोहिदास भोसले (वय 50 रा. पिंपळागाव कौडा) यांनी फिर्याद दिली आहे. गोपीचंद याचा विवाह श्रुती सोबत झाला होता. विवाह झाल्यापासून गोपीचंद व श्रुती यांच्यात वेळोवेळी वाद होत होते. श्रुती ही गोपीचंद याच्यासोबत भांडण करून तिच्या माहेरी वडारवाडी येथे जात होती. सध्या ती माहेरी वडारवाडी येथे होती. सासरी नांंदायला येण्यासाठी श्रुतीने गोपीचंदकडे 30 हजार रुपयांची मागणी केली होती. तिच्या आई-वडिलांच्या खर्चासाठी तीने गोपीचंदकडे 30 हजार रूपयांसाठी तगादा लावीत होती.

या त्रासाला कंटाळून शनिवारी रात्री गोपीचंद याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे कमल भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे  करीत आहे.

Web Title: Ahmednagar Husband commits suicide by strangling his wife

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here