Home संगमनेर Theft: संगमनेर तालुक्यात शिव कलेक्शन कापड दुकान फोडले

Theft: संगमनेर तालुक्यात शिव कलेक्शन कापड दुकान फोडले

Shiv Collection cloth shop theft in Sangamner taluka

संगमनेर | Theft: संगमनेर तालुक्यातील पठारभागातील घारगाव येथील किरण कोंडाजी गागरे यांच्या मालकीचे शिव कलेक्शन हे कापड दुकान फोडल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. चोरट्यांनी दुकानातील जीन्स, शर्ट, आदी साहित्य चोरून नेले आहे. या चोरीच्या घटनेमुळे घारगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घारगाव येथे किरण गागरे यांच्या मालकीचे शिव कलेक्शन कापड दुकान आहे. रविवारी गागरे हे दुकान बंद करून घरी गेले. अज्ञात चोरट्यांनी सोमवारी पहाटे दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. आणि दुकानातील महागडे कपडे चोरून पोबारा केला. सोमवारी सकाळी गागरे यांनी नेहमीप्रमाणे दुकान उघडले असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले, त्यांनी वरती पहिले असता पत्रा उचकटलेला होता. घारगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. दरम्यान काही दिवसांपूर्वी असे घारगाव परिसरात कापड दुकान फोडल्याची घटना घडली होती.

Web Title: Shiv Collection cloth shop theft in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here