Home अहमदनगर लग्नाच्या सहाव्या दिवशीच नवरी फरार

लग्नाच्या सहाव्या दिवशीच नवरी फरार

Ahmednagar News bride absconded on the sixth day of the marriage

नेवासे | Ahmednagar News: नेवासे येथील मुलाच्या कुटुंबियांकडून मध्यस्थीने १ लाख ७० हजार रुपये घेऊन एका मुलीशी लग्न लावून दिले गेले. मात्र सहाच दिवसात रक्षाबंधनासाठी माहेरी जात असल्याचे सांगून नववधू अंगावरील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह पसार झाली. लग्न जुळविणार मध्यस्थी महिलादेखील पसार झाल्या आहेत.

नेवासे येथील रहिवासी संतोष उत्तम बोडखे हे कापड विक्रीचा व्यवसाय करतात. लग्न जमत नसल्याने त्यांचे नातलग शोधमोहीम करत होते. याच दरम्यान वाळूज जवळ पंढरपूर येथील सुमनबाई साळवे यांनी एक स्थळ असल्याचा निरोप बोडखे व त्यांच्या कुटुंबियांना दिला. तसेच मुलगी पाहण्यासाठी बोडखे कुटुंबियांना बोलावून घेतले होते. संतोष व त्याच्या नातलगांनी कांचनवाडीत येऊन मुलगी पहिली. सुमनबाईने त्यांना अंजली पवार यांच्या फ्ल्यटवर नेत तीय्हे वाढी शुभांगी प्रभाकर भोयर रा. सिडको हिची ओळख करून दिली. मुलीच्या घराची परस्थिती बिकट असल्याने संतोष यांनी त्यांना २ लाख रुपये द्यावेत असा प्रस्ताव सुमनबाई व अंजली यांनी ठेवला. तडजोड करून १ लाख ७० हजार देण्याचे ठरले. त्याच दिवशी म्हणजे २० ऑगस्ट रोजी बजाजनगरात नोटरी करून शुभांगी व संतोष यांचा विवाह लावून देण्यात आला. त्याअगोदर पैसेही देण्यात आले. लग्न झाल्यानंतर शुभांगी ही संतोष सोबत नेवासे येथे आली होती. २४ ऑगस्ट रोजी संतोष व शुभांगी यांचा विधिवत पुन्हा विवाह लावण्यात आला. यावेळी बोडखे कुटुंबीय यांनी शुभांगीला ५० हजारांचे दागिने घातले. मात्र दुसऱ्याच दिवशी राखी पौर्णिमेला माहेरी जाऊन येते असा आग्रह शुभांगीने धरला. पती तिला माहेरी सोडण्यासाठी कारने निघाला. सासू वंदना भोयर यांना फोन केला. अशा प्रकारे बोडखे कुटुंबियांची फसवणूक झाली.

Web Title: Ahmednagar News bride absconded on the sixth day of the marriage

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here