Home अकोले Bhandardara Dam: भंडारदरा व मुळा धरणात इतके टक्के पाणीसाठा

Bhandardara Dam: भंडारदरा व मुळा धरणात इतके टक्के पाणीसाठा

percentage of water stored in Bhandardara dam and mula

अहमदनगर | Bhandardara Dam: अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण भागातील पाथर्डी, शेवगाव व नगरसह अन्य तालुक्यांत जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नदी नाले विहिरी भरल्या आहेत. शेवगाव पाथर्डी तालुक्यात अति पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी पावसाने उघडीप दिली आहे.

बुधवारी सकाळी भंडारदरा धरण ८६.८६ टक्के भरले तर मुळा धरण ७३.८६ टक्के भरले. निळवंडे धरण ७७.४ टक्के भरले आहे. धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. तसेच सध्या अकोले तालुक्यात पावसाने उघडीप दिली आहे.  ऑगस्ट महिना संपला तरी देखील भंडारदरा धरण भरलेले नाही त्यामुळे लाभक्षेत्रातील नागरिकांकडून चिंता व्यक्त होत आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे. मात्र धरण पूर्णपणे भरण्याची आशा येथील नागरिकांना लागून राहिली आहे.

Web Title: percentage of water stored in Bhandardara dam and mula

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here