Home अहमदनगर राज्यात आज मंदिरे खुली मात्र अहमदनगर ६ मंदिर परिसरात जमावबंदी लागू

राज्यात आज मंदिरे खुली मात्र अहमदनगर ६ मंदिर परिसरात जमावबंदी लागू

Ahmednagar News Curfew imposed in Ahmednagar 6 temple area

अहमदनगर | Ahmednagar News: आजपासून घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरं भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. राज्यभरातील मंदिरांची दारं उघडली असून भक्तांनी देवदर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. राज्यातील मंदिरं खुली होणार असली तर अहमदनगरमध्ये मात्र धार्मिक स्थळं सध्या खुली केली जाणार नाही. अहमदनगर जिल्ह्यात नवरात्रीच्या पूर्व संध्येला 6 मंदिर परिसरांमध्ये 144 कलम म्हणजे जमावबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आला आहे.

7 तारखेपासून 20 ऑक्टोबरपर्यंत हे नियम लागू असणार आहेत. यामध्ये पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी मंदिर, कर्जत तालुक्यातल्या राशीन येथील जगदंबा देवी मंदिर, केडगाव येथील रेणुका माता मंदिर, नगर एमआयडीसी येथील रेणुकामाता मंदिर, बुऱ्हाणनगर येथील तुळजाभवानी मंदिर आणि नगर शहरातील पाईपलाईन रोडवरील रेणुकामाता मंदिर या 6 मंदिर परिसरात 144 कलम लागू करण्यात आलं आहे.

अहमदनगर जिल्ह्यात नवरात्रीच्या पूर्व संध्येला 6 मंदिर परिसरांमध्ये 144 कलम म्हणजे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी हे आदेश काढले आहेत. पण, जमावबंदी असली तरी भक्तांना ऑनलाईन पास घेऊन दर्शन घेता येणार आहे. एक देवस्थान ठिकाणी रोज 5000 हजार भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

Web Title: Ahmednagar News Curfew imposed in Ahmednagar 6 temple area

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here