Home अहमदनगर डीवायएसपी संदीप मिटके यांच्यावर आरोपीचा गोळीबार, थोडक्यात वाचले

डीवायएसपी संदीप मिटके यांच्यावर आरोपीचा गोळीबार, थोडक्यात वाचले

Crime News Accused fired on DYSP Sandeep Mitke

राहुरी | Crime News: अपहरण केलेल्या मुलाची सुटका करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर आरोपीनं गोळीबार केल्याची घटना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घडली आहे. या गोळीबारात डीवायएसपी संदीप मिटके (DYSP SANDIP Mitke) थोडक्यात बचावले असून आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे. हा आरोपी पुण्यातील बडतर्फ पोलिस अधिकारी असल्याची माहिती आहे.

राहुरी येथे नुकतेच बंदुकीच्या जोरावर एका प्रतिष्ठित महिलेचे अपहरण करून ‘माझ्याशी संबंध ठेव’, असे सांगत मारहाण करण्याऱ्या निलंबित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला होता. ‘माझ्यावर खोटा गुन्हा दाखल का केला?’ असे म्हणत या पोलीस अधिकाऱ्यानं महिलेच्या घरी गोळीबार करून धुडगूस घातला. त्या महिलेच्या मुलांना डांबून ठेवले होते. त्यांना वाचविण्यास गेलेले श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्यावर आरोपीने रिव्हलवर रोखले, मिटके यांनी प्रसंगावधान राखल्याने गोळी चुकली आणि उपअधीक्षक मिटके हे थोडक्यात बचावले.

आरोपी हा पुणे येथील निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे. त्याने गुरुवारी सकाळी डिग्रस येथील त्या महिलेच्या घरात प्रवेश केला. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लहान मुलांना डांबून ठेवले. महिलेने या घटनेची माहिती दिली. काही वेळातच  पोलिसांचा फौजफाटा तेथे दाखल झाला. सुटका करण्याचे काम सुमारे दोन तास सुरू होते. अखेर पोलिसांनी आरोपीवर झडप घालून त्याच्याकडील शस्त्र काढून घेण्याचा प्रयत्न. यावेळी रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली, ती अधीक्षक मिटके यांचा डोक्याजवळून गेल्याने संदीप मिटके थोडक्यात बचावले. आरोपीला ताब्यात घेण्यात असले. यावेळी वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आरोपीस अटक करण्यात आली आहे.

Web Title: Crime News Accused fired on DYSP Sandeep Mitke

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here