Crime News: अल्पवयीन मुलास पळवून नेले, गुन्हा दाखल
श्रीरामपूर | Crime News: बेलापूर रोड, गायकवाड वस्ती येथे राहत असणाऱ्या एका अल्पवयीन मुलास अज्ञात व्यक्तीने फूस दाखवून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलाची आई वैशाली सचिन करपे ह्या न्यायालयीन कामकाजासाठी औरंगाबाद येथे गेल्या होत्या. घरी वैशाली यांच्या आई तसेच दोन मुले होती. मात्र न्यायालयीन कामकाज आटोपून घरी आल्या असता त्यांचा अल्पवयीन मुलगा राज उर्फ लकी (वय 11) हा दुपारी जेवण करून बाहेर गेला तो परत आला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो मिळून आला नाही. मुलगा राज उर्फ लकी यास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले आहे, असे वैशाली करपे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
लकी हा अंग सडपातळ, रंग सावळा, उंची 4 फूट, अंगात चॉकेलेटी पांढर्या पट्ट्याचा टीशर्ट, काळ्या रंगाची जीन्स पँट, नाक सरळ, काळे डोळे, पायात सँडल, मांडीवर तीळ व उजव्या हाताच्या पंजावर ओम असे गोंदलेले आहे. असे वर्णन असलेला मुलगा आपल्यास आढळून आल्यास तातडीने श्रीरामपूर पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Web Title: Crime News minor boy was abducted