Accident: संगमनेर तालुक्यात विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू
संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांचा मृत्यू झाला आहे. आश्वी बुद्रुक येथील रमेश राधुजी गायकवाड वय ६५ आणि पानोडी येथील ओंकार गणेश पवार वय १५ या दोघांचा वेगवेगळ्या घटनांत विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पानोडी शिवारातील आश्वी साकुर रस्त्यालगत असलेल्या पवार वस्तीलगत ओंकार हा मुलांसमवेत खेळत होता. यावेळी जवळच असलेल्या विजेच्या खांबाला ओंकारचा हात लागल्यामुळे विजेचा जोरदार धक्का बसल्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात हलविण्यात आले मात्र त्याचा उपचाराआधीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ओंकार आठवीत शिक्षण घेत होता.
तर दुसऱ्या घटनेत आश्वी बुद्रुक येथील रमेश गायकवाड यांनाही विजेचा जोरदार धक्का बसल्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीने लोणी येथील रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेण्यात आले मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी उशिरा दोघांचेही पानोडी व आश्वी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अकस्मात मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: Accident Two killed in Sangamner taluka