Home अहमदनगर मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत: रोहित पवार

मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाहीत: रोहित पवार

Ahmednagar News Free vaccinations are not a blessing

अहमदनगर | Ahmednagar News: लोकांनी भरलेल्या करामधून केलं जाणारे लसीकरण म्हणजे उपकार नाहीत येत ते सरकारचे कर्तव्य आहे. पंतप्रधान यांचे आभार मानणारे फलक लावण्याचे युजीसीची सूचना आश्चर्यकारक वाटते. कदाचित हे पंतप्रधान मोदिजीना देखील माहित नसेल अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी म्हंटले आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण जबाबदारी केंद्रसरकारने घेतली आहे. देशातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात येणार असल्याची घोषणा मागेच केली आहे. त्यानुसार काम सुरु आहे.

दरम्यान विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीनं एक परिपत्रक काढलं आहे. यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी काढलेल्या परिपत्रकात मोफत लसीकरणासंबंधी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानणारे फलक शैक्षणिक संस्थांमधून लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावरून टीका टिप्पणी विविध माध्यमातून सुरु आहे. रोहित पवार यांनीही ट्विट करत निर्णयावर टीका केली आहे. कोरोना  आणि विद्यार्थी यांच्याबाबत तरी असं राजकारण करु नये,’ असेही पवार यांनी म्हटलं आहे.

Web Title: Ahmednagar News Free vaccinations are not a blessing

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here