कार्याचा मोठा गौरव: आ. निलेश लंकेची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन मध्ये नोंद
अहमदनगर | Nilesh Lanke: आमदार निलेश लंकेना आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन ने निलेश लंके यांच्या कार्याचा गौरव सन्मान करण्यात आला आहे.
कोरोना काळात एका आमदाराचे नाव महारष्ट्रात कौतुकाने घेतले जाते. आमदारांचे कोविड सेंटर राज्यातील चर्चेचा विषय ठरला. अनेक रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू उमटविण्याचे काम या काळात या माणसाने करून दाखविले आहे.
कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल आज मला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला हा सन्मान भेटला ही खुप मोठी गोष्ट आहे. हे सगळे शक्य झाले माझ्यावरती प्रेम करणाऱ्या मायबाप जनतेमुळे व सहकारी असे ट्विट त्यांनी केले आहे.
त्यांनी ११ बेडचे कोविड सेंटर उभारले. सर्व आरोग्य सुबिधा मिळवून दिल्या. त्यांनी त्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर विदेशातून मदत मिळवत कोविड सेंटर उभारले.
Web Title: MLA Nilesh Lanke World Book of Records in London