Home अहमदनगर साहित्य टाकण्याच्या कारणातून दोन कुटुंबात हाणामाऱ्या

साहित्य टाकण्याच्या कारणातून दोन कुटुंबात हाणामाऱ्या

Crime News Two families clashed over the dumping of literature

श्रीरामपूर | Crime News:  बांधकाम साहित्य टाकण्याच्या कारणातून खटकळी (बेलापूर) येथे दोन कुटुंबात हाणामाऱ्या होऊन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहे.

याबाबत अरुण बाळू धीरोडे याने फिर्याद दिली असून त्यात म्हंटले आहे की, वडील बाळू धराडे यांनी आपल्या जागेत बांधकाम साहित्य टाकू नका असे बोलण्याने राग आल्याने पाच जणांनी घरात घुसून शिवीगाळ करीत मारहाण केली. त्याचबरोबर जीवे मारण्याची धमकी दिली. यामध्ये आई परीघाबाई जखमी झाली आहे. त्यावरून निलेश शेलार, दिनेश शेलार, योगेश शेलार, पप्पू खरात, मनीषा दिनेश शेलार यांच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याविरोधात दिनेश भागवत शेलार याने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, आरोपीने बेकायदेशीर जमाव जमवून घरात घुसून तुम्ही आमच्या जागेत टाकलेले बांधकाम साहित्य का उचलले नाही? असे म्हणत शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व धमकी दिली.

त्यानुसार आरोपी सुनील बाळू धीरोडे, सुनील भानुदास गांगुर्डे, अरुण बाळू धीरोडे, दिलीप मोहन निकम, मंगल पवार, मंदा दिलीप निकम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस पो. ना. रामेश्वर ढोकणे करीत आहे.

Web Title: Crime News Two families clashed over the dumping of literature

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here