Home अहमदनगर वहिनीवरच दिराचा अत्याचार, दोघांवर गुन्हा दाखल

वहिनीवरच दिराचा अत्याचार, दोघांवर गुन्हा दाखल

Rape case Dira's atrocities on Vahini

अहमदनगर | Rape: नगर शहरातील एका उपनगरात राहत असणाऱ्या ३४ वर्षीय विवाहित महिलेवर तिच्या दिराने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. तसेच पतीनेही अनैसर्गिक संभोग केला असल्याची फिर्याद पिडीत महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिली आहे.

या फिर्यादीवरून पोलिसांनी तिचा पती व दीर यांच्याविरोधात अत्याचार व अनैसर्गिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

जानेवारी २०२१ पासून हा प्रकार सुरु असल्याचे पिडीतेने म्हंटले आहे. नगर शहरातील एका उपनगरात आपल्या पतीसोबत पिडीत महिला राहते. त्या महिलेच्या इच्चेविरुद्ध पतीने तिचा वारंवार अनैसर्गिक संभोग केला तसेच दिरानेही अत्याचार केल्याचे पिडीतेने म्हंटले आहे. याप्रकरणी दोघा भावंडावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे करीत आहे.  

Web Title: Rape case Dira’s atrocities on Vahini

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here