Home अहमदनगर नवरदेवाच्या ताटाला वटकण लावण्यावरून लग्न मोडलं

नवरदेवाच्या ताटाला वटकण लावण्यावरून लग्न मोडलं

Ahmednagar News marriage broke up after the bridegroom's plate

अहमदनगर | Ahmednagar News: कर्जत तालुक्यातील एका विवाह समारंभात लग्न झाल्यानंतर वधू वरांच्या ताटाला वटकन लावण्यावरून वाद झाल्याने वराकडील मंडळी जास्त पैशाचे वटकन लावण्यावरून अडून बसली. त्यातून झालेल्या संतापातून वधूपित्याने लग्न मोडण्याचे ठरविले. नंतर हे प्रकरण पोलिसांत गेले असता तेथेसुद्धा वधू आणि वरपिता आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने वराकडील मंडळीना लग्न होऊनही रिकाम्या हाती यावे लागले आहे.

कर्जत तालुक्यातील एका गावात रविवारी विवाह सोहळा संपन्न झाला. वधू वर एका तालुक्यातील आहेत. वधू वर यांचा जेवणाचा कार्यक्रम सुरु झाला. वरच्या ताटाला वटकन लावण्याची प्रथा असल्याने वधूकडच्यानी दोनशे रुपयांचे वटकन लावले मात्र ही रक्कम कमी असल्याने नवरदेव रुसला. जास्त पैशाचे वटकण लावल्याशिवाय जेवणार नाही अशी भूमिका घेतली. ही मागणी वधूपित्याने फेटाळली. यावरून वाढ वाढत मुलीला सासरी न पाठविण्याचा निर्णय घेतला.

कुटुंबाला मुलीपेक्षा पैसा महत्वाचा वाटतो तेथे मुलगी देण्यात अर्थ नाही. आज हा प्रकार घडला, उद्या आणखी काही मागण्या करून त्रास देतील, त्यामुळे आपण मुलीला सासरी न पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे वधूपित्याचे म्हणणे होते.यामुळे वातावरण अगदी गंभीर झाले. ग्रामस्थांनी मध्यस्थी केली मात्र काहीच उपयोग झाला नाही अखेर वर पक्षाने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने हे तात्काळ विवाहस्थळी आले. त्यांनी नेमका प्रकार समजून घेत वधूपित्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ते निर्णयावर ठाम होते. मग वधूचे मत घेण्याचे ठरले. ती सज्ञात असल्याने तिच्या लग्नाचा निर्णय घेण्याचा तिला पूर्ण अधिकार असल्याचे पोलिसांनी तिला सांगितले. त्यावर नवरीनेही आपण वडिलांच्या निर्णयासोबत असल्याचे सांगितले. तेथे पोलिसांचाही नाइलाज झाला. शेवटी वरपक्षाला रिकाम्या हाताने परत जावे लागले.

Web Title: Ahmednagar News marriage broke up after the bridegroom’s plate

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here