Home अहमदनगर कामावरून काढून टाकल्याने त्याने थेट ऑफिस पेटविले आणि कंपनीच्या गाड्याही फोडल्या

कामावरून काढून टाकल्याने त्याने थेट ऑफिस पेटविले आणि कंपनीच्या गाड्याही फोडल्या

Ahmednagar News fired directly at the office and blew up company cars

अहमदनगर | Ahmednagar News: ट्रान्सपोर्ट कंपनीने कामावरून काढून टाकल्याने एका ट्रकचालकाने चांगलीच दहशत केली. सिमेंट कंपनीच्या तक्रारीवरून त्याला काढून टाकण्यात आले, त्याबदल्यात कंपनीचे केडगाव येथील कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न केला तर त्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गाड्या रस्त्यावर अडवून काचा फोडत दमबाजी केली. अखेर पोलिसांनी त्यास अटक केली आहे.

भीमा सर्जेराव सकट वय ३२ रा. स्टेशन रोड अहमदनगर असे आरोपीचे नाव आहे. तो रघुजी ट्रान्सपोर्टमध्ये ट्रकचालक म्हणून कामास होता. त्याच्याविरुद्ध तक्रार आल्याने त्यास कामावरून काढून टाकण्यात आले होते. यातूनच त्याने हल्ले केले आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

केडगावमधील कार्यालयाचे व्यवस्थापक मल्लीनाथ हनुमंत बोगले यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून फिर्यादीनुसार, १५ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास भीमा हा कार्यालयात येऊन तुमच्या सांगण्यावरून मला कंपनीतून काढून टाकले असे म्हणत धक्काबुकी करत सत्तुरचा धाक दाखविला. रात्री पुन्हा ऑफिसमध्ये येत खिडकीची काच फोडत ज्वलनशील पदार्थ आत टाकत आग लावून दिली. यात कंपनीचे नुकसान झाले.

दुसरी फिर्याद सोमनाथ अभिमन्यू लोखंडे (ट्रक चालक) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, १७ जून रोजी मी ट्रकमध्ये माल भरून ती घेऊन असताना सकाळी नऊच्या सुमारास आरोपी भिमा सकट दुचाकीवरून आला आणि माझी गाडी अडविली. व मला म्हणाला की, रघुजी ट्रान्सपोर्टची कोणतीही गाडी मी चालु देणार नाही. मला दिसल्यास मी ती फोडून टाकीन, असे म्हणून त्याने गाडीवर दगडफेक करुन गाडीची समोरील काच फोडली. गाडीच्या केबीनमध्ये येवून मला शिवीगाळ, मारहाण करुन माझ्या खिशातील दोन हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. यानंतर तुमचे ट्रान्सपोर्टची गाडी मला दिसल्यास मी ती फोडून जाळून टाकीन अशी धमकी देत निघून गेला.

पोलीस पथक त्याचा शोध घेत होते. आरोपी सकट केडगावमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी त्यास अटक केली.

Web Title: Ahmednagar News fired directly at the office and blew up company cars

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here