Home महाराष्ट्र भाजपाला मोठा धक्का: विदर्भातील १० नगरसेवकांनी हाती बांधले शिवबंधन

भाजपाला मोठा धक्का: विदर्भातील १० नगरसेवकांनी हाती बांधले शिवबंधन

10 corporators shivsena Entry from Vidarbha 

मुंबई: विदर्भातील भाजपच्या १० नगरसेवकांनी शिवसेना पक्षात पदार्पण केले आहे. १० नगरसेवकांनी भाजपच्या कामाला कंटाळून भाजपाला रामराम ठोकत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधल्याची माहिती मिळाली आहे.

विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. एकाच वेळी १० विद्यमान नगरसेवक व दोन माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडचिट्ठी दिल्याने भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. हे सर्व नगरसेवक हिंगणघाट नगरपरिषदेमध्ये नगरसेवक आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावे येऊन शिवबंधन बांधले आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपसोबत जुळवून घेण्याबाबत पत्र उद्धव ठाकरे यांना लिहिल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्याचे दिसून येत आहे.

हिंगणघाट नगरपरिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे यांच्या सह सतीश धोबे, सुरेश मुंजेवार, मनीष देवढे, मनोज वरघने, भास्कर ठवरे, निलेश पोगले, नीता धोबे, संगीता वाघमारे, सुनिता पचोरी, प्रतिभा पडोळे, देवेंद्र पडोळे, डॉ. महेंद्र गुढे यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे.

Web Title: 10 corporators shivsena Entry from Vidarbha 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here