Home संगमनेर संगमनेर: अवैध वाळू वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडला

संगमनेर: अवैध वाळू वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडला

Sangamner Eicher Tempo caught transporting illegal sand

संगमनेर | Sangamner: शेळकेवाडी येथे मुळा व कच नदीपात्रातून विनापरवाना वाळू वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडला आहे. हे वाहन घारगाव पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले आहे.

संगमनेरचे नायब तहसीलदार सुभाष कदम यांना एका गुप्त खबऱ्यामार्फत शेळकेवाडी येथे मुळा नदी पात्रातून अवैध उपसा होत असल्याची माहिती मिळाली. उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे व तहसीलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार सुभाष कदम, मंडलाधिकारी बापूसाहेब ससे यांसह कामगार तलाठी युवराजसिंग जारवाल यांच्या पथकाने शेळकेवाडी परिसरातील मुळा नदीपात्रातून शेळकेवाडी घारगाव मार्गे नाशिक पुणे महामार्गाकडे जाणारा विनापरवाना वाळूची वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडला. चौकशी केल्यानंतर विनापरवाना असल्याचे निष्पन्न झाल्याने हे वाहन घारगाव पोलीस ठाण्याच्या आवारात लावले असून, दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: Sangamner Eicher Tempo caught transporting illegal sand

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here