Home अहमदनगर कोरोनाचा आहेर: लग्नात वधू वरासह २५ जणांना कोरोनाची बाधा

कोरोनाचा आहेर: लग्नात वधू वरासह २५ जणांना कोरोनाची बाधा

Ahmednagar news rahuri 25 corona positive in ceromony

राहुरी | Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यात नव्या निकषांवर पहिल्या स्तरात काही निर्बंध हटविण्यात आले आहे. लग्न सोहळ्याचे देखील निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. १०० जणांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्याचे परिणाम समोर आले आहे.

राहुरी तालुक्यातील कणगर येथील एका विवाह सोहळ्यात वधू वरांसहीत २५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नवविवाहित थेट कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होण्याची वेळ आली आहे.

दोन दिवसांपूर्वी कणगर गावातील एका वस्तीवर विवाह समारंभ आयोजित करण्यात आला होता. वधू व वर हे एकाच गावातील आहे. लग्नानंतर हळद फेडण्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर नवरदेवाला त्रास जाणवू लागला. त्यामुळे तो खासगी रुग्णालयात नेण्यातआले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर करोना चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला. यामध्ये नवरदेव कोरोना बाधित असल्याचे निदान झाले. नवरीला देखील त्रास जाणविल्याने तिची सुद्धा चाचणी करण्यात आली. तिलाही बाधा झाल्याचे निदान झाले. या दोघांनाही कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.

लग्नात आलेल्या सर्व नातेवाईकांना मनात शंका आल्याने सरपंच सर्जेराव घाडगे यांनी दोन्ही ठिकाणच्या वऱ्हाडी मंडळीच्या चाचणी शिबीर घेण्यात आले. लग्नाला हजर असलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये २५ जणांना बाधा झाल्याचे निदान झाले आहे. सर्वाना राहुरी कृषी विद्यापीठाच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. गावकर्यांनी घाबरून न जाता आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन सरपंचानी केले आहे.  

Web Title: Ahmednagar news rahuri 25 corona positive in ceromony

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here