Home क्राईम Murder Case: खून करून तब्बल २० दिवस पुलाच्या पाईपमध्ये लपविला मृतदेह

Murder Case: खून करून तब्बल २० दिवस पुलाच्या पाईपमध्ये लपविला मृतदेह

Murder Case body hidden in bridge pipe

शिरूर| Murder Case: अनोळखी तरुण मध्यरात्री घरात घुसल्याच्या रागातून घरातील तीन जणांनी त्यास लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करीत हत्या केली. त्यानंतर तब्बल २० दिवस एका छोट्या पुलाच्या पाईप मध्ये मृतदेह लपवून ठेऊन पुरावा नष्ट करणाऱ्या बाप लेकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल रात्री अटक केली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

मयत गौतम हा गेल्या १७ मे पासून बेपत्ता झाला होता. याबाबत त्याचे नातेवाईक अवनीश कुमार याने रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. बेपत्ता गौतम याचा घातपात झाला असल्याचा संशय त्यांनी पोलिसांना भेटून व्यक्त केला.

जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे अन्वेन्षण समांतर तपासाला सुचना दिल्या. त्यामुळे घनवट पोलीस पथकाने गेल्या काही दिवसांपासून रांजणगाव परिसरात पाळत ठेवली. संशियीतांच्या हालचालींवर पाळत ठेवण्यात आली, काल रात्री संशास्पद फिरत असलेल्या इस्लाम सम्मानी, रियाज सम्मानी व अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली.

दिनांक १७ मे रोजी रात्री मी लघुशंकेसाठी बाहेर आलो असता आशिषकुमार गौतम हा अनोळखी तरुण थेट घरात शिरला. त्यामुळे राग अनावर झाल्याने मी मुलांना उठवून त्यास जाब विचारला. त्याने मात्र उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला असा जबाब इस्लाम सम्मानी यांनी दिला असल्याचे घनवट यांनी सांगितले.  

Web Title: Murder Case body hidden in bridge pipe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here