Home अहमदनगर ब्रेंकिंग: ६१ लाखाचे चंदन घेऊन जाणारा टेम्पो पोलिसांनी पकडला

ब्रेंकिंग: ६१ लाखाचे चंदन घेऊन जाणारा टेम्पो पोलिसांनी पकडला

Ahmednagar News Tempo carrying 61 lakh sandalwood was caught by the police

अहमदनगर | Ahmednagar News: नगर मनमाड रोडवरून राहुरी कारखाना येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने मध्यप्रदेशकडे ६५० किलो चंदन घेऊन जाणारा टेम्पो पकडल्याची कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली. यामध्ये केरळ राज्यातील दोघांना ताब्यात घेतले आहे.

शनिवारी नगर मनमाड मार्गावरून १६ बीसी- ७९९९ नंबरचा सम्राट कंपनीच्या टेम्पोमधून पाठीमागे बाजूस हौदाच्या खाली चंदन टाकून त्यावर लोखंडी प्लेट फिट करून मध्यप्रदेश येथे जात असल्याची माहिती संदीप मिटके यांच्या खबऱ्यामार्फत मिळाली असता मिटके यांच्या पाठाक्ने देवळाली प्रवरा पोलीस चौकीतील पोलीस हवालदार गणेश फाटक याना सदर टेम्पो अडविण्याची सुचना देण्यात आली.

त्यानुसार गणेश फाटक व त्यांचे साथीदार यांनी राहुरी कारखाना येथे सदर टेम्पो अडविल्यानंतर टेम्पो हा मोकळा असल्याचे आढळून आले. परंतु पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके व त्यांचे पथक घटनास्थळी आल्यावर टेम्पो चालक व साथीदार यांना पोलीस खाकी दाखवताच टेम्पोच्या हौद्यात खालच्या बाजूला चंदन लपवून ठेवल्याचे सांगितले. टेम्पोतील लोखंडी प्लेटाचे नात बोल्ट खालून व वरून खोलून लोखंडी प्लेट बाजूला करत सुमारे ६५० किलो चंदन सापडले.

या चंदनाची किंमत सुमारे ६१ लाख व १० लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण ७१ लाखांचा मुदेमाल ताब्यात घेण्यात आला. चालक व साथीदार यांची चौकशी केली असता त्यानी अब्दुल फकरुद्दीन रहेमान, अब्दुल मोहम्मद निसाद ही नवे सांगितली, हे केरळ राज्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Ahmednagar News Tempo carrying 61 lakh sandalwood was caught by the police

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here