प्रेमातून झालेल्या छेडछाडीतून चुलत बहिणींनी घेतले विष
पारनेर | Ahmednagar News: पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील गुरुवारी १६ वर्षीय चुलत बहिणींनी विषारी कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एकीचा मृत्यू झाला तर दुसरी अत्यवस्थ आहे. एकतर्फी प्रेमातून झालेल्या छेडछाडीतून हे कृत्य केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
या दोघी दहावी उत्तीर्ण आहेत. अल्पवयीन असल्याने नावे टाळली आहेत. त्यांनी दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास कीटकनाशक प्राशन केले/. ही बाब क=लक्षात येताच त्यांना शिरूर येथील रुग्नालायात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना एकीचा मृत्यू झाला आहे तर दुसरी अत्यवस्थ आहे. तिची प्रकृती सुधारत असल्याची माहिती समजते. पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी पडमने तपास करीत आहे.दुसरी मुलगी शुद्धीवर आल्यावर पोलीस तिचा जबाब घेणार आहे. त्यानंतर घटनेचा उलगडा होणार आहे.
Web Title: Ahmednagar News Suicide taken by cousins from love affair