Home अहमदनगर पाण्यात बुडणाऱ्या मुलाला वाचविताना बाप लेकांचा मृत्यू

पाण्यात बुडणाऱ्या मुलाला वाचविताना बाप लेकांचा मृत्यू

Ahmednagar News Today Baap Leka dies while rescuing a drowning child

कोपरगाव | Ahmednagar News Today: कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर येथील मंडपी नाल्यात बापलेकाचा बुडून दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. यामध्ये  सचिन संजय मोरे वय 15 व संजय मारूती मोरे वय 35 यांचा बुडून मृत्यु झाला आहे. यावेळी मुलाला वाचविताना वडीलांचाही मृत्यु झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  सोमवारी रात्री कोपरगाव परीसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसाने परीसरातील ओढे नाले ओसांडून वहात आहे. मंगळवारी दुपारी वडील संजय मोरे यांच्याबरोबर मुलगा सुनिल मंडपी नाल्यावरून जात असताना सुनिलचा तोल गेल्याने तो नाल्यात पडला. ही बाब वडील संजय यांच्या लक्षात येताच त्यांनी पाण्यात उडी घेवून मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मुत्यु झाला.

ग्रामस्थांनी बाप लेकांचा शोध घेत पाण्यात उड्या घेऊन बाहेर काढले. त्यांना रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान घटनास्थळी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी भेट दिली.

Web Title: Ahmednagar News Today Baap Leka dies while rescuing a drowning child

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here