अहमदनगर: मतदानावेळी एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Ahmednagar | Pathardi News: तालुक्यातील करंजी (Karanji) येथे मतदान करून बाहेर येताना हृदयविकाराचा झटका आल्याने एकाचा जागीच मृत्यू (Died).
पाथर्डी: तालुक्यातील करंजी येथे मतदान करून बाहेर येताना हृदयविकाराचा झटका आल्याने यामध्ये सुनील कांतीलाल गांधी (48) यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मतदान करण्यासाठी घरी येऊन दमदाटी करत मारहाण केली म्हणून नवनाथ निवृत्ती सुतार यांनी मोना अभयकुमार गुगळे याच्या विरोधात पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील करंजी, चिचोंडी, जवखेडे खालसा, दगडवाडी, धारवाडी, डोंगरवाडी, गितेवाडी, डमाळवाडी, रेणुकावाडी या पश्चिम भागातील ग्रामपंचायतीसाठी रविवारी शांततेत मतदान पार पडले. एकंदरित करंजीमध्ये सकाळपासूनच मतदारांचा मतदान करण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. मतदान प्रक्रिया साडेपाच वाजता शांततेत पार पडली. एकूण 84 टक्के मतदान या निवडणुकीसाठी झाले. या निवडणुकीमध्ये नशीम रफिक शेख व विजया आबासाहेब अकोलकर दोघींमध्ये सरपंच पदासाठी काटे की टक्कर झाली असून या दोघींसह त्यांच्या इतर सदस्य पदाच्या उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे. दोन्ही गटाकडून विजयाची खात्री दिली जात आहे.
चिचोंडी या ठिकाणी देखील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून 84 टक्के मतदान या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी झाले असून याठिकाणी श्रीकांत एकनाथ आटकर व विष्णू गंडाळ यांच्यात सरपंच पदाची लढत झाली असून त्यांच्यासह इतरही सदस्यांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे.
दगडवाडी याठिकाणी स्वाती सचिन शिंदे व उषा सुभाष शिंदे या दोघींमध्ये काटे की टक्कर होणार असून याठिकाणी देखील 84 टक्के मतदान झाले आहे. याठिकाणी मात्र मागील पंचवार्षिक निवडणूक प्रसंगी मोठा वादविवाद झाला होता त्यामुळे याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जवखेडे खालसा तसेच इतर गावांतही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सोमवारी दुपारपर्यंत या सर्व ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती येणार आहेत. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सर्व ग्रामपंचायतच्या निवडणुकीप्रसंगी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे सर्वांना आवाहन केले होते.
Web Title: Ahmednagar One died of heart attack during polling
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App