Home महाराष्ट्र ऐन दिवाळीत सदावर्तेंकडून एसटी बंदची हाक, सुषमा अंधारे म्हणल्या; “फडणवीसांचा .…”

ऐन दिवाळीत सदावर्तेंकडून एसटी बंदची हाक, सुषमा अंधारे म्हणल्या; “फडणवीसांचा .…”

Gunratne Sadavarte | Maratha Reservation: गुणरत्न सदावर्ते  यांनी पुकारलेला संप ही एक राजकीय खेळी असल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

Maratha Reservation Sushma Andhare calls for ST bandh from Sadavarten on Ain Diwali

Gunratne Sadavarte: सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी गुणरत्न सदावर्ते यांया नेतृत्त्वातील एसटी कष्टकरी जनसंघ या एसटी कामगार संघटनेने ऐन दिवाळीत संपाची हाक दिली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होणार आहेत. तसंच, त्यांनी मराठा आरक्षणाविरोधातही (Maratha Reservation) षडयंत्र केलं होतं. यामुळे ते सध्या बरेच चर्चेत आहेत. यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यानी हल्लाबोल केला आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“सदावर्तेंना लोक स्वीकारतील का हा खरा प्रश्न आहे. परंतु, सदावर्ते दिवाळीच्या तोंडावर खेळी करत आहेत, ही एक राजकीय खेळी आहे”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

संबंध महाराष्ट्रात मराठा आरक्षणादरम्यान गुणरत्न सदावर्ते हे फडणवीसांचा माणूस, फडणवीसांचा बोलका बाहुला आहे, असं वातावरण तयार झालं. मी फडणवीसांचा माणूस नाही किंवा फडणवीसांशी तसा अर्था अर्थी संबंध नाही, हे सांगण्याचा भाबडा प्रयत्न म्हणून सदावर्ते फडवीस सरकारमध्ये असताना आंदोलन करत आहेत. परंतु, लोक अशा भ्रामकतेला फसणार नाहीत, हेही तितकंच खरं”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. म्हणजे, गुणरत्न सदावर्ते यांनी पुकारलेला संप ही राजकीय खेळी असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

Web Title: Maratha Reservation Sushma Andhare calls for ST bandh from Sadavarten on Ain Diwali

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here