Home औरंगाबाद आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही, जरांगे पाटलांनी सांगितला पुढचा कार्यक्रम

आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही, जरांगे पाटलांनी सांगितला पुढचा कार्यक्रम

Maratha Reservation: मराठा समाजावर खूप अन्याय झाला, आरक्षण मिळण्याचा दिवस जवळ येत आहे. तसेच जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपले आंदोलन सुरु राहणार.

Retreat without taking Maratha reservation, Jarange Patal told the next program

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधत मराठा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे. आपली प्रकृती चांगली आहे. मी ठणठणीत आहे. काळजी करु नका. डॉक्टरांनी मला ठणठणीत बरे केले आहे. आता आरक्षण मिळाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. आतापर्यंत मराठा समाजावर खूप अन्याय झाला आहे. परंतु आता चांगले दिवस आले आहे. आरक्षण मिळण्याचा दिवस जवळ येत आहे. तसेच जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपले आंदोलन सुरु राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील प्रत्येक गावात १ डिसेंबरपासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच आपण पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. महाराष्ट्रातील दौरा कधीपासून सुरु होणार ते उद्या किंवा परवा जाहीर करणार आहे. या दौऱ्यात आतापर्यंत राहिलेल्या भागांत आपण जाणार असून मराठा समाजाचे आशीर्वाद घेणार आहोत.

आपले आंदोलन शांततेचे आणि लोकशाही मार्गाचे आहे. उद्रेक होईल, असे काही करु नका. कोणी आत्महत्या करु नका. २४ डिसेंबरपर्यंत आपणास खांद्याला खांदा लावून लढायचे आहे. एकाही भावाने आत्महत्या करायची नाही. आरक्षणाचा दिवस जवळ आलेला असताना आत्महत्या करतायत मग आरक्षण कोणाला द्यायचे असा सवाल त्यांनी केला आहे. न्यायाचा दिवस जवळ आला आहे. न्याय मिळवण्यासाठी सातत्य ठेवावे लागणार आहे. आता आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही.

सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी सोमवारी येणार आहे. त्यावेळी वेळाचा मुद्दा निकाली लागणार आहे. राज्यात प्रथमच एकाच वेळी तीन समित्या काम करत आहे. मागावर्गीय आयोग, शिंदे समिती आणि न्यायमूर्तींची समिती काम करत आहे. यामुळे आता पूर्ण आरक्षण मिळण्याचा दिवस जवळ आला आहे.

Web Title: Retreat without taking Maratha reservation, Jarange Patal told the next program

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here