Home अहमदनगर दारू पिताना झालेल्या वादातून एकाचा डोक्यात दगड घालून खून

दारू पिताना झालेल्या वादातून एकाचा डोक्यात दगड घालून खून

Ahmednagar One murder from clashes

अहमदनगर | Ahmednagar: शहरातील तारकपूर बसस्थानकाजवळील कराचीवालानगर येथील मोकळ्या मैदानात रविवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास एकत्र एकत्र दारू पिण्यास बसल्यानंतर किरकोळ कारणातून वाद निर्माण झाले. या वादातून तरुणाने एका वृद्धाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.

रामदास तुकाराम प्रभुणे वय ६५ रा. बोल्हेगाव असे या व्यक्तीचा खून झाला आहे. रविवारी सायंकाळी रमेश हिवाळे हा बोल्हेगाव येथून रामदास प्रभुणे यांना कामानिमित्त कराचीवालानगर या परिसरात घेऊन आला. तेथे दारू पिताना झालेल्या वादातून हिवाळे याने प्रभुणे यांच्या डोक्यात दगडाने मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला असे गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट यांनी सांगितले.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी आरोपी रमेश देवदान हिवाळे याला रविवारी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे.   

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Ahmednagar One murder from clashes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here