Home संगमनेर संगमनेर तालुक्यात सोमवारी 9 व्यक्ती करोनाबाधित

संगमनेर तालुक्यात सोमवारी 9 व्यक्ती करोनाबाधित

Sangamner Taluka nine infected monday

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात शहरातील एक तर ग्रामीण भागातील 8 जण बाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या 4 हजार 514 वर पोहोचली आहे.

सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात शहरातील इंदिरानगर येथील 38 वर्षीय पुरुषाला करोनाची लागण झाली आहे.  

त्याचबरोबर  तालुक्यात संगमनेर खुर्द येथे 48 वर्षीय पुरुष, आश्वी खुर्द येथे 40 वर्षीय पुरुष, आश्वी बुद्रुक येथे 65,62 वर्षीय महिला, कोकणगाव येथे 39 वर्षीय पुरुष, जोर्वे येथील 55 वर्षीय पुरुष, साकूर येथे 30 वर्षीय महिला, हिवरगाव पठार येथे 33 वर्षीय पुरुष यांना करोनाची लागण झाली आहे.  

संगमनेर तालुक्यात रविवारी 7 रुग्ण आढळून आले होते तर शनिवारी 24 व्यक्तीची भर पडली आहे. बाधितांच्या गतीला काही प्रमाणत ब्रेक लागलेला दिसून येत आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Sangamner Taluka nine infected Monday

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here