Home अहमदनगर खोटे विवाह करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

खोटे विवाह करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Ahmednagar Fraudulent marriage scam exposed

अहमदनगर: शेतकरी कुटुंबातील वाढत्या वयाच्या तरुणांच्या विवाह जमविण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. याचाच फायदा घेत पुरुषांकडून हुंडा घेऊन त्यांच्याशी खोटे विवाह करून फसवणूक करणारी टोळीस नेवासा पोलिसांनी अटक केली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या घटनेची माहिती दिली. एका विलक्षण योगायोगाच्या घटनेने फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे.

रुपाली पांडुरंग जगताप, शारदा भागाजी तनपुरे, सागरबाई किसान डवरे रा. बुलढाणा मायावती नारायण चपाते, अनिल नाथा झिने, रा.  जालना यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयीन दोन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

दिनांक ७ नोव्हेंबर रोजी रात्री रेखा अभिमान शिंदे(खरे नाव रुपाली जगताप) असे नाव सांगणारी एक महिला नेवासा पोलीस ठाण्यात आली. तिने आपल्याला येथे विकण्यात आले असे पोलिसांना सांगितले. परंतु ती गावचे नाव सांगत नव्हती. तिचे कोणी नातेवाईक नव्हते. फक्त एक मोबाईल नंबर होता. तो औरंगाबादचा होता. त्यावेळी ज्ञानेश्वर शंकर जायगुडे रा. साईनाथ नगर नेवासा हे पोलीस ठाण्यात पत्नी हरविल्याची तक्रार घेऊन आले. या योगायोगाच्या संशयातून अभिनव त्यागी यांनी सखोल तपास केला. यातून खोटे विवाह करून फसवणूक करणारी टोळी उघडकीस आली.

ज्ञानेश्वर जायगुडे यांचा विवाह होत नसल्याने ते मुलीच्या शोधात होते. त्याचवेळी त्यांच्या ओळखीच्या मध्यस्थीतून शारदा तनपुरे ही मुलगी विवाहासाठी असल्याचे समजले. मुलीच्या घरच्यांनी दोन लाख रुपये हुंडा घेऊन मधमेश्वर येथे लग्न लावून दिले. त्याचवेळी ज्ञानेश्वर यांच्यासोबत जेऊर हैबती येथील एका तरुणाचे याच पद्धतीने हुंडा घेऊन लग्न लावण्यात आले. विवाहानंतर तीन दिवसांनी ६ नोव्हेंबरला रात्री रुपाली जगताप ही अंगावरील व घरातील दागिने घेऊन निघून चालली होती. परंतु रात्री अपरात्री रस्त्यावर फिरणारी महिला म्हणून काही लोकांनी तिला नेवासा पोलीस ठाण्यात आणून सोडले. त्यामुळे तिने आपल्याला विकल्याचा बनाव केला. 

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Ahmednagar Fraudulent marriage scam exposed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here