Home अहमदनगर समृद्धी महामार्गावर भरधाव कारचं टायर फुटून कार दुभाजकावर आदळून अपघात, दोघे ठार

समृद्धी महामार्गावर भरधाव कारचं टायर फुटून कार दुभाजकावर आदळून अपघात, दोघे ठार

Ahmednagar Samruddhi Highway Car Accident Two Death: कोकमठाण शिवारात भरधाव कारचं टायर फुटून कार दुभाजकावर आढळून भीषण अपघात.

Ahmednagar Samruddhi Highway car Accident Two Death

कोपरगाव: समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात भरधाव कारचं टायर फुटून कार दुभाजकावर आढळून भीषण अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती की कारच्या पुढील भागाचा पूर्ण चक्काचूर झाला असून दोन्ही एअर बॅग उघडले तरी दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन तरूणी जखमी आहे. जखमींवर कोपरगावच्या एसजेएस रुग्णालयात उपचार सुरू आहे.

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. या अपघातात वाहनात असलेला चालक बालंबाल बचावला. मात्र शुक्रवारी दुपारच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात एक मारुती सुझुकी कंपनीची ब्रिझा कार क्र.एम एच ४९ बीबी ६६२० चा डाव्या बाजूचा टायर फुटून ती कार दुभाजकावर आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की कारच्या पुढच्या भागाचा पूर्ण चक्काचूर झाला आहे.

याबाबत समृद्धी महामार्गावरील सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राजेश राजाराम रहाटे (वय अंदाजे ५२ वर्ष रा.नागपूर) हे आपली मुलगी लीना राजेश रहाटे ((वय १८) भाची अवंतिका वझुलकर (वय १६)आणि मेव्हूणी अल्का वझुलकर(वय ४२) रा.भंडारा यांना सोबत घेऊन समृध्दी महामार्गावरून वैद्यकीय कारणास्तव नागपूर वरून नाशिकच्या दिशेने जात होते.

शुक्रवारी दुपारच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात आल्यानंतर त्यांच्या कारचा टायर फुटून कार दुभाजकावर आदळल्याने यामध्ये राजेश रहाटे आणि अलका वझुलकर हे गंभीर जखमी झाले. स्थानीक नागरिक आणि समृद्धी महामार्गावरील मदतनीसांनी त्यांना कोपरगाव येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता तेथे उपस्थित डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आणि दोन्ही जखमी तरुणी लीना आणि अवंतिका यांच्यावर एसजेएस रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस समृद्धी महामार्गावरील रुग्णवाहिका आणि एमएसएफचे जवान मदतीसाठी पोहोचले. यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Ahmednagar Samruddhi Highway car Accident Two Death

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here