Home अकोला भाजप महिला नेत्याच्या पतीची रेल्वेखाली आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये केला दावा

भाजप महिला नेत्याच्या पतीची रेल्वेखाली आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये केला दावा

एका शिक्षण संस्थेच्या संचालकांनी धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या (Suicide).

BJP woman leader's husband commits suicide under a train

नागपूर: बँकेच्या संचालकांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावून गुन्ह्यात अडकविल्याचा आरोप करत अकोला जिल्ह्यातील एका शिक्षण संस्थेच्या संचालकांनी धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी नागपुरात ही घटना घडली. शुक्रवारी त्याचा उलगडा झाला.

अविनाश मनतकार (६०, रा. तेल्हारा, जि. अकोला) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अविनाश यांच्या पत्नी नयना या भाजपच्या प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष असल्याचे सांगितले जाते. मनतकर यांचे पुत्र अभिलाष यांनी म्हटले की, या प्रकरणामुळे वडील प्रचंड व्यथित होते. त्यांना पेट्रोल पंपदेखील विकावा लागला होता.

मनतकार यांच्या निकटस्थ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनतकार हे तेल्हारा येथील वांगेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक होते. काही दिवसांपूर्वी मलकापूर अर्बन बँकेच्या भ्रष्टाचारप्रकरणी मनतकार दाम्पत्यावर आरोप झाल्याने ते व्यथित होते. गुरुवारी दुपारी मनतकार दाम्पत्य न्यायालयीन कामकाजाच्या निमित्ताने नागपुरात आले. अविनाश हे त्यांच्या पत्नीजवळ शेगावला जायचे आहे, असे सांगून निघाले. रात्र झाली तरी ते परतले नाही. त्यांच्याकडे मोबाइलही नव्हता. त्यामुळे नयना यांनी नातेवाइकांना कळवून शोधाशोध केली.

मनतकार यांनी मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली. मलकापूर अर्बन बँकेचे चैनसुख संचेती, उपाध्यक्ष लखानी यांनी स्वतःचा भ्रष्टाचार आमच्यावर लावून आम्हा पती-पत्नीला फसविले. या प्रकरणात संचालक मंडळ दोषी आहे की नाही, याची पोलिसांनी चौकशी केली नाही. संचेती – लखानी यांनी दिलेल्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे या चिठ्ठीत त्यांनी लिहिले आहे. रामदासपेठ पोलिस स्टेशनचे पो. नि. शेळके यांनी ३८ लाख रुपये घेतल्याचेही त्यांनी लिहिले आहे

Web Title: BJP woman leader’s husband commits suicide under a train

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here