Home अकोले अहमदनगर ब्रेकिंग: बस-कारच्या धडकेत अकोलेतील शिक्षकासह दोघांचा मृत्यू

अहमदनगर ब्रेकिंग: बस-कारच्या धडकेत अकोलेतील शिक्षकासह दोघांचा मृत्यू

Ahmednagar Accident:  अहमदनगर- कल्याण महामार्गावरील घटना, धोत्रे गावच्या (ता. पारनेर) शिवारात शेखवस्ती नजीक एसटी बस आणि कारमध्ये भीषण अपघात, दोन शिक्षक जागीच ठार, तर एक शिपाई गंभीर जखमी.

Two people, including a teacher, died in a bus-car Accident in Akole

पारनेर : नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील धोत्रे गावच्या ता. पारनेर शिवारात शेखवस्ती नजीक एसटी बस आणि कारमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन शिक्षक जागीच ठार, तर एक शिपाई गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी (दि.१७) सायंकाळी चारच्या सुमारास हा अपघात झाला.

अपघात एवढा भयानक होता की, कारचा चक्काचूर झाला. अपघात घडताच मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह कारचा दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  मुरबाड आगाराची एसटी बस (क्र. एम. एच. २० बी. एल. २४५७) ही कल्याणहून अहमदनगरकडे जात असताना धोत्रे गावच्या शेखवस्तीनजीक अहमदनगरहून आळे फाट्याकडे जाणाऱ्या कार (क्र. एम. एच. १७ ए. झेड, ३४९१) यांची समोरासमोर धडक अपघातानंतर कारमधील कळंब (ता. (अकोले) येथील विद्यालयाचे सहायक शिक्षक ईश्वरचंद्र रामचंद्र पोखरकर (वय ५१, रा. शिवलीला, अमृत पेठ नारायणमळा, नारायणगाव) व कोतूळ ता. अकोले येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक नामदेव दादाभाऊ बर्वे (वय ५२, रा. कोतूळ, ता. अकोले) हे जागीच ठार झाले. अविनाश कुंडलिक पवार शिपाई हा गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानचे बाळासाहेब खिलारी, रामभाऊ ऊर्फ किरण तराळ, अंकुश पायमोडे, दत्ता निवडुंगे, भोंद्रे झाली. गावचे सरपंच अभिषेक झावरे, पप्पू कसबे, सुधीर भांड, मेजर सासवडे यांनी यांनी मृतदेह कारमधून बाहेर काढून तातडीने टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. एका जखमीला अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे.

टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीष लोंढे यांनी शवविच्छेदन करून दोन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. पुढील तपास पारेनरचे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल बी. बी. भोसले, श्रीनाथ गवळी, रवींद्र साठे आदी करत आहेत.

Web Title: Two people, including a teacher, died in a bus-car Accident in Akole

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here