Home क्राईम संतापजनक! बापानेच पोटच्या अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार; बालिका गरोदर…

संतापजनक! बापानेच पोटच्या अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार; बालिका गरोदर…

Mumbai Rape News: खान्देश्वरमध्ये नराधम बापाने आपल्याच अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना.

Rape Case father himself abused the minor girl

मुंबई: नराधम बापाने आपल्याच अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पनवेलमधील खान्देश्वर येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना घडून दोन महिन्यांचा काळ लोटून गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  लैंगिक अत्याचारानंतर अल्पवयीन मुलगी २ महिन्यांची गरोदर राहिल्याने आईला सदर घटना समजली. आईने खान्देश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलीसांनी पॉस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपी नराधम बापाला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Rape Case father himself abused the minor girl

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here