Home अहमदनगर दोन विद्यार्थिनींना लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्यांना अटक

दोन विद्यार्थिनींना लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्यांना अटक

Ahmednagar Arrested for abducting two female students: एका खबऱ्यामार्फत अधिक माहिती काढून त्या दोघांचा शोध घेऊन त्यांना अटक केली.

Arrested for abducting two female students after luring them into marriage

शेवगाव | Shevgaon News : अल्पवयीन दोन शाळकरी विद्यार्थिनींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना पळवून नेऊन त्यांच्यावर बीड जिल्ह्यातील युवकांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार शेवगाव पोलिसांनी त्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

या प्रकरणी विजय श्रीमंत सानप (वय २२, रा. मोराळा, ता. आष्टी) व बाजीराव प्रभू कदरे (वय २२, रा. नागतळा, ता. आष्टी, जि. बीड) अशी त्या युवकांची नावे असून, शेवगाव पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

१५ फेब्रुवारीला शाळेत गेलेल्या दोन्ही अल्पवयीन मुली, सायंकाळी शाळेतून घरी परतल्या नाहीत. त्यामुळे दोन्ही मुलींच्या चिंतित नातेवाइकांनी शेवगाव पोलिस ठाण्यात स्वतंत्र दोन गुन्हे दाखल करून मुली हरवल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी तत्काळ सूत्रे हलवत सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बागुल यांच्या नेतृत्वाखाली पथकांची नियुक्ती केली. एका खबऱ्यामार्फत अधिक माहिती काढून त्या दोघांचा शोध घेऊन त्यांना अटक केली.

पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक विलास पुजारी, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बागुल यांच्या नेतृत्वाखाली, पोलिस कर्मचारी धनाजी काळोखे, किशोर शिरसाट, वासुदेव ढमाले, महिला पोलिस कर्मचारी शिरसाट, गीतांजली पथारकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Arrested for abducting two female students after luring them into marriage

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here