Home पुणे संतापजनक! मतिमंद मुलीवर तीन वेळा बलात्कार, गर्भवती राहिल्याने….

संतापजनक! मतिमंद मुलीवर तीन वेळा बलात्कार, गर्भवती राहिल्याने….

Baramati Crime news: नराधमाने मतिमंद मुलीवर बलात्कार (Raped) केल्याने ती गर्भवती राहिल्याची घटना उघडकीस.

Mentally retarded girl raped three times, pregnant

बारामती: पुण्यातील बारामती तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधमाने मतिमंद मुलीवर बलात्कार केल्याने ती गर्भवती राहिल्याची घटना उघडकीस आली आहे.

नराधमाने तिच्यावर तीन वेळा अत्याचार केले असून यातून ती गर्भवती राहिली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक (Arrested) केली आहे.

शिवराज पोपट खरात (रा.कांबळेश्वर ता. बारामती, जि. पुणे) असे आरोपी नराधमाचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार पाच महिन्यांपूर्वी घडला आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव येथे आरोपीने त्याच्या घरात हे कृत्य केले. मुलीच्या पोटात दुखत असल्याचे तिला तिच्या घरच्यांनी उपचारासाठी बारामती महिला रुग्णालयात दाखल केल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, आईने मुलीला विश्वात घेऊन तिला विचारले असता तिने तिच्यावर बेतलेला प्रसंग सांगितला. आरोपी हा तिच्या घराशेजारी राहत असून मुलगी ही घरासमोर खेळत असताना त्याने तिला जबरदस्तीने घरात नेऊन तिचे इच्छा विरुद्ध शारीरिक संबंध(Sexual Relation) ठेवले. हा प्रकार तीन वेळा घडला. यातून ती १९ आठवड्यांची गर्भवती (pregnant) राहिली. तिच्या घरच्यानी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे,  अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक देवीदास साळवे यांनी दिली.

Web Title: Mentally retarded girl raped three times, pregnant

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here