Home अहमदनगर रुग्णाच्या नातेवाईकांकडून हॉस्पिटलवर दगडफेक

रुग्णाच्या नातेवाईकांकडून हॉस्पिटलवर दगडफेक

Ahmednagar Stone pelting at the hospital 

अहमदनगर | Ahmednagar:  पवार सर्जिकल आणि जनरल हॉस्पिटल वसंत टेकडी येथील हॉस्पिटलवर रुग्णाच्या नातेवाइकांनी दगडफेक करून नुकसान केल्याची घडली आहे. सदर घटना ही १८ मार्च रोजी घडली.

याप्रकरणी रोहिणी राजेंद्र पवार यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास दानवे आजी या वृद्ध महिलेला जेवण जात नसल्याने वैदुवाडी येथील ठुबे डॉक्टर यांनी पुढील उपचारासाठी पवार हॉस्पिटलमध्ये पाठविले. डॉ, रोहिणी पवार यांनी करोना टेस्ट करून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले. दानवे आजी यांना रक्त कमी असल्याने बाटलीद्वारे रक्त देण्यास सुरुवात केली. आजीचे नातेवाईक वैभव सुनील काळभोर व त्याचा मित्र असे दोघे जण लक्ष देण्यासाठी थांबले होते. डॉ. राजेंद्र पवार वेळोवेळी दानवे आजींचे रक्त चेक करत होते म्हणून वैभव सुनील काळभोर व त्याचा मित्र खाली जाऊन येतो असे सांगून तेथून निघून गेले. त्यांनतर ते रात्री १०.३० वाजेच्या सुमारास हे दोघे दारू पिऊन रुग्णाजवळ आले. व डॉ. राजेंद्र पवार यांना म्हणाले की, तुम्ही आजीकडे नीट लक्ष देत नाही. आजीला लावलेले रक्त नीट जात नाही. आम्ही सांगतो तसे करा असे म्हणून डॉ. राजेंद्र पवार यांना शिवीगाळ करून धक्काबुकी केली. डॉ. रोहिणी पवार हे हॉस्पिटलमध्ये आल्यावर त्यांनाही शिवीगाळ केली. त्यानंतर वैभव याने नातेवाईक व मित्र यांना बोलावून हॉस्पिटलवर दगडफेक करत नुकसान केले.

याप्रकरणी डॉ. रोहिणी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैभव काळभोर, विशाल पवार, मोन्या आणि वैभवचे १२ मित्र यांच्याविरोधात तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Ahmednagar Stone pelting at the hospital

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here