Home अहमदनगर लग्नाचे आमिष दाखवत शिक्षिकेवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवत शिक्षिकेवर अत्याचार

Atrocities on teachers showing the lure of marriage

अहमदनगर: न्यायालयात काम करीत असलेल्या एकाने लग्नाचे आमिष दाखवत एका शिक्षिकेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी पिडीत शिक्षिकेने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी रवींद्र राजेंद्र सोनवणे वय ३१ रा. तपोवन रोड, नगर याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. 

तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांच्या पथकाने सोनवणे याला राहता येथून अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, पिडीत महिला आष्टी तालुक्यात शिक्षिका म्हणून नोकरी करत असून ती नगर येथे राहते. काही दिवसांपूर्वी आरोपी सोनवणे याच्यासोबत ओळख झाली. फिर्यादीने सोनवणेकडे कायदेशीर पद्धतीने लग्न करण्याची अट घातली. याबाबत सोनवणे याने त्याच्या आई वडिलांना यासंदर्भात माहिती दिली. सोनवणे याच्या आई वडिलांनी फिर्यादी शिक्षिकेला मारहाण करण्यात आली.

आरोपी सोनवणे याने या शिक्षिकेवर लग्नाचे आमिष देत वेळोवेळी अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. सोनवणे याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे हे करीत आहे.

Web Title: Atrocities on teachers showing the lure of marriage

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here