Home अहमदनगर दरोड्याच्या तयारीत असलेले दोन दरोडेखोर जेरबंद, चार फरार

दरोड्याच्या तयारीत असलेले दोन दरोडेखोर जेरबंद, चार फरार

Two robbers arrested in preparation for a robbery

राहता | Rahata: दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या दरोडेखोरांना स्थानिक गुन्हेच्या शाखेच्या पथकाला सापळा रचून जेरबंद करण्यात यश आले आहे.

पाण्याच्या पाटाच्या कडेला एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाला दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना ताब्यात घेतले असून दरोड्यासाठी वापरण्यात आलेली वाहने जप्त करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, सराईत गुन्हेगार शुभम काळे रा. गणेशनगर ता. राहता व त्याचे साथीदार दरोड्याच्या तयारीत असल्याची खात्रीदायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यानुसार राहता परिसरात सापळा रचला. त्यावेळी घटनास्थळी अंधारात पाच ते सहा इसम मोटारसायकलवर कुजबुज करताना दिसून आले. पथकातील अधिकारी यांनी त्यांना गोलाकार घेराव घातला. पोलिसांना पाहताच ते पळू लागले.पोलिसांनी पाठलाग करून शुभम काळे वय २१ व भरत तानाजी काळे याना ताब्यात घेतले. तर अनिल काळे, अक्षय आव्हाड, गणेश तेलोरे, राहुल वाघमारे हे चार जण फरार झाले.

या पकडलेल्या दोघांकडे एक विना क्रमांकाची बुलेट गाडी, बजाज कंपनीची पल्सर, एक तलवार, एक मोबाईल, एक गलोल एक मिरची पूड असा एकूण ७१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

Web Title: Two robbers arrested in preparation for a robbery

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here