Home अहमदनगर कापड दुकान फोडून सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल लंपास

कापड दुकान फोडून सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल लंपास

Ahmednagar theft cloth shop and stole goods

अहमदनगर | Ahmednagar: नगर तालुक्यातील रुईछतिशी  येथील शिवशांती कापड दुकान फोडून चोरट्यांनी सव्वा दोन लाखांच्या कपड्यांची चोरी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवशांती कापड दुकान हे रात्री उशिरा फोडण्यात आले.चोरट्यांनी दुकानच्या छताचे पत्रे उचकटून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी साडी, जीन्स, रुमाल, टी शर्ट टावेल, बनियन या कपड्यांची चोरी केली आहे. यामध्ये सुमारे सव्वा दोन लाखाचा माल चोरांनी लंपास केला आहे. याप्रकरणी दुकान मालक बिभीषण शंकर सुरवडे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. गुन्हेगारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Web Title: Ahmednagar theft cloth shop and stole goods

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here