Home पाथर्डी माहेरी आलेल्या विवाहीतेचा मुलासह विहिरीत बुडून मृत्यू

माहेरी आलेल्या विवाहीतेचा मुलासह विहिरीत बुडून मृत्यू

Pathardi woman drowned in a well with her child

पाथर्डी | Pathardi: पाथर्डी तालुक्यात मढी येथे बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली आहे. दिवाळीनिमित्त भाऊबीजेला माहेरी आलेल्या आई व आठ वर्षाच्या मुलाचा विहिरीत पाय घसरून पडल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला आहे.

ओम नवनाथ गादे वय ८ आणि वनिता नवनाथ गादे वय २८ वय रा. देवी निमगाव ता. शेवगाव असे या मयत आई व मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वनिता ही वडील नानासाहेब बोरुडे यांच्याकडे भाऊबिजेला आली होती. बुधवारी सकाळी सासरी देवीनिमगाव येथे जाण्यासाठी निघाली असता मुलगा ओमला घेऊन शेतातील म्हसोबाच्या दर्शनासाठी गेली होती.

रस्त्याच्याच कडेला विहीर असल्याने ओमचा पाय घसरून विहिरीत पडला. ओम पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्याला वाचविण्यासाठी आईने विहिरीत उडी मारली. त्यामुळे आई व मुलाचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच नागरिक व नातेवाईक घटनास्थळी आले. आई व मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. सायंकाळी ४  वाजता मुलगा ओमचा मृतदेह आढळून आला. मात्र आईच्या मृतदेहाचा उशिरापर्यंत शोध लागलेला नव्हता. मुलाचा मृतदेह पाहून नागरिकांनी शोक व्यक्त केला.   

Web Title: Pathardi woman drowned in a well with her child

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here