Home संगमनेर संगमनेर तालुक्यात बुधवारी 23 जण करोनाबाधित

संगमनेर तालुक्यात बुधवारी 23 जण करोनाबाधित

Sangamner Taluka 23 corona infected total 5031 

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात 23 जण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची संख्या 5  हजार 31 वर पोहोचली आहे.

बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात शहरातील कोष्टी गल्ली येथील 21 वर्षीय तरुण, भारतनगर येथील 42 वर्षीय पुरुष,  शिवाजीनगर येथील 28 वर्षीय महिला, विद्यानगर येथील 54 वर्षीय पुरुष, साईबन वसाहतीत 70 वर्षीय महिला,  आंबेडकर नगर येथील 35 वर्षीय महिला, आठ वर्षीय बालक, सावतामाळी नगर येथील 50 वर्षीय महिला करोनाबाधित आढळून आले आहेत.  

तर तालुक्यातून उंबरी बाळापूर येथे 51 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, घुलेवाडी येथे  29 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुण, काकडवाडी येथे 80 वर्षीय पुरुष, मेंढवण येथे 47 वर्षीय महिला, दाढ बु. येथे  40 वर्षीय पुरुष, रहाणेमळा गुंजाळवाडी येथे 44 वर्षीय पुरुष,  मंगळापूर येथे 73 वर्षीय महिला, धांदरफळ खुर्द येथे 36 वर्षीय महिला, चिखली मधील  61,60 वर्षीय पुरुष,  साकूर येथे 70 वर्षीय पुरुष, निमगाव जाळी मधील 25 वर्षीय तरुण, सुकेवाडी येथे 35 वर्षीय पुरुष  असे एकूण 23 जण करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 5 हजार 31 इतकी झाली आहे.

Web Title: Sangamner Taluka 23 corona infected total 5031 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here