Home अहमदनगर चोरट्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम सेंटर फोडले

चोरट्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम सेंटर फोडले

Ahmednagar Thieves break into Bank of Maharashtra's ATM

अहमदनगर: नगर शहरातील पाईपलाईन रोडवरील संकल्प अपार्टमेंट ग्राउंड प्लोअरला असलेले एटीएम सेंटर बुधवारी पहाटे चोरट्यांनी फोडले. यावेळी परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव मात्र फसला.

एटीएम मशीन चोरून नेण्यासाठी चोरटे स्कार्पियो गाडी घेऊन आले होते. मोठ्या प्रयत्नांनी हे एटीएम  फौंडेशन चोरट्यांनी तोडले. मात्र हे एटीएम मशीन घेऊन जात असताना परिसरातील नागरिक जागे झाल्याने त्यांनी तेथून पळ काढला. या घटनेची माहिती समजताच तोफखाना पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक सुरसे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि याप्रकरणाचा शोध सुरू केला.

दरम्यान नगर शहरात काही दिवसांपासून घरफोड्या, चोरीचे प्रमाण वाढले आहे. दिवाळी सणानिमित्त शहरात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने चोरटे मोबाईल, पाकिटे रोख रक्कम चोरण्याचा फायदा घेत आहे.  पोलिसांनी नगर शहरात चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.  

Web Title: Ahmednagar Thieves break into Bank of Maharashtra’s ATM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here