Home संगमनेर चोरट्यांनी नर्सरीचे ऑफिस तोडून रोख रक्कम व बी बियाणे केले लंपास

चोरट्यांनी नर्सरीचे ऑफिस तोडून रोख रक्कम व बी बियाणे केले लंपास

Sangamner broke the nursery office and made cash and seeds theft

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे नाशिक पुणे महामार्गालगत अष्टविनायक हायटेक नर्सरीचे ऑफिस तोडून रोख रक्कम व विविध जातीचे बी बियाणे चोरून नेल्याची घटना घडली आहे. यामध्ये १ लाख ११ हजार रुपयांचा माल लांबविला आहे.

मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारस ही घटना घडली आहे. या घटनेतील चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संदीप तान्हाजी लेंडे हे आळेफाटा येथील रहिवाशी आहे. घारगाव शिवारात अष्टविनायक हायटेक नर्सरी आहे. त्यांनी विक्रीसाठी झेंडू, टोमाटो, कोबी, वांगी आदी बी बियाणे विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी नर्सरीत प्रवेश करीत ऑफिसचे शटर उचकटून आत प्रवेश केला. कपाटातील बी बियाणे व रोख रक्कम असा १ लाख ११ हजार रुपये लंपास करीत पोबारा केला. लेंडे हे सकाळी नर्सरीत गेले असता चोरी झाल्याचे त्यांना समजले. सीसीटीव्ही कॅमेरा तपासला असता शटर उचकटून दोन जणांनी आत [प्रवेश केला तर काही जण बाहेर थांबलेले होते. याबबत संदीप लेंडे यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Sangamner broke the nursery office and made cash and seeds theft

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here