Home अकोले अकोले पोलीस ठाण्याचे तीन पोलीस निलंबित

अकोले पोलीस ठाण्याचे तीन पोलीस निलंबित

Three policemen of Akole police station suspended

अकोले: पोलीस स्टेशनच्या आवारातून वाळू प्रकरणात ताब्यात असलेल्या टेम्पोचे डिस्कसह दोन टायर चोरी करण्यास मदत केल्याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यातील तीन कर्मचार्याना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी हे निलंबन केले आहे.

पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब भोसले, पोलीस कॉन्स्टेबल धनंजय दुडवाल व वाहनचालक चंद्रकांत विठ्ठल सदाकाळ यांना निलंबित करण्यात आले आहे.

दिनांक २ फेब्रुवारी २०२० रोजी पोलिसांनी वाळू तस्करी प्रकरणी तालुक्यातील गणेश शंकर आवारी यांचा टेम्पो ताब्यात घेतला होता. हा टेम्पो पोलिस ठाण्याच्या आवारात असताना जून महिन्यात टेम्पोचे डिस्कसह दोन चाके चोरीला गेले. ही चोरी उघडकीस आली असून पोलिसांनी चोरी प्रकरणी विनायक नरहरी साबळे यास ताब्यात घेतले. या तीन पोलीस कर्मचारी यांनी मदत केल्याचा ठपका आला होता. पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी अहवाल सादर केला. अधीक्षकांनी कारवाई करत तिघा पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

Web Title: Three policemen of Akole police station suspended 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here