Home अहमदनगर अहमदनगर: पहाटेच्या सुमारास दोन एटीएम चोरट्यांनी फोडले

अहमदनगर: पहाटेच्या सुमारास दोन एटीएम चोरट्यांनी फोडले

Ahmednagar Two Atm theft

Ahmednagar News Live | Theft |अहमदनगर:  सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोडवर असलेल्या बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र हे दोन एटीएम चोरट्यांनी फोडल्याची घटना आज सोमवारी पहाटे घडली. यामध्ये  यामधून किती रक्कम चोरीला गेली याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. तोफखाना पोलीस व फिंगर प्रिंट, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. बॅंकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सोमवारी पहाटे चोरट्यांनी पाईपलाईन रोडवर बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या दोन एटीएम मशीन कटरच्या सहाय्याने फोडले. एटीएम फोडण्यापूर्वी चोरांनी एटीएम मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याला कलर स्प्रे मारला होता. सकाळी काही ग्राहक एटीएमवर आल्यानंतर त्यांना एटीएम फोडल्याचे उघडकीस आले. स्थानिक नागरिकांनी याबाबत तोफखाना पोलिसांना माहिती दिली.  तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलीस दलाने श्वानपथक पाचारण केले होते. श्वान एटीएम मशीन आणि एटीएम मशीनसमोरचा परिसरातच घुटमळले. चोरटे हे वाहनातून आल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पाईपलाईन रोडवरील यापूर्वीही एटीएम मशीन चोरांनी फोडलेले आहे. वर्षभरामध्ये एटीएम फोडीच्या अनेक घटना घडल्या आहेत. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Ahmednagar Two Atm theft

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here