Home अहमदनगर सेल्फीच्या नादात तळ्यात पाय घसरून दोन तरुणांचा मृत्यू

सेल्फीच्या नादात तळ्यात पाय घसरून दोन तरुणांचा मृत्यू

Shrigonda Drawn Two youths die after slipping in a pond while taking selfies

Ahmednagar News Live | Shrigonda | श्रीगोंदा:  श्रीगोंदा शहराजवळ आनंदकर मळ्यातील शेततळ्यावर सेल्फीच्या नादात तळ्यात पाय घसरून पडल्यामुळे दोन परप्रांतीय तरुणांचा बुडून (Drawn) मृत्यू झाल्याची घटना रविवार (ता.2) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.

मूळ राजस्थानी फर्निचर कारागीर असलेले सुरेंद्रकुमार हारडू (वय १८ वर्षे) व लक्ष्मण ओमनाथ (वय १७ वर्षे ९ महिने) हे दोन तरूण रविवारी कामावर सुट्टीला होते. आनंदकर मळ्यात फिरायला गेल्यावर तेथील शेत तळ्यात मोबाईलवर सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. त्यांच्याबरोबर अजून दोघे जण सहकारी तरुण होते. त्यातील सुरेंद्रकुमार व लक्ष्मण हे दोघे सेल्फी काढत असताना एकाचा तोल गेल्याने तळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या तरुणाने तळ्यात उडी मारली. दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघे बुडू लागल्याने वर उभ्या असणाऱ्या तरुणांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केला. यावेळी नागरिक जमा झाले मात्र  तोपर्यत या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

Web Title: Shrigonda Drawn Two youths die after slipping in a pond while taking selfies

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here